Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : १७ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागीर फरार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोन्याचे बिस्कीट बॉक्स आणि सोन्याची लगड असा एकुण १७ लाख रूपये किंमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेवून ‍बंगाली सोने कारागीर फरार झाल्याची खळबळजनक घटना गुरूवारी २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी अंती सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सराफ बाजार परिसरात असलेले सोन्याचे व्यापारी हे सोन्याचे तुकडे आणि बिस्कीटापासून बंगाली कारागीरांपासून दागिने बनविले जाते. याच पध्दतीने सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा वय ३० रा. लक्ष्मी नगर, जळगाव आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा रा. जळगाव हे देखील बंगाली कारागीर यांच्याकडे विश्वासाने सोन्याचे तुकडे किंवा सोन्याचे बिस्कीटे देवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून घेतात. या विश्वासावर दोन्ही सोन्याचे व्यापारी वर्मा आणि शर्मा यांनी बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन वय २८, रा. मंडूलीका बाजार, ता. जगत वल्लभपूर जि. हुगली राज्य पंश्चिम बंगाल ह.मु. जोशी पेठ यांला १५ लाख रूपये किंमतीची २५४ ग्रॅम सोन्याची लगड आणि २ लाख रूपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकुण १७ लाखांचे सोने दानिगे बनविण्यासाठी दिले. दरम्यान बंगाली सोने कारागिर शेख अमीरूल हुसेन हा १७ लाखांचे सोने घेवून पसार झाल्याचे गुरूवार २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. यासंदर्भात सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेतली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता बंगाली सोने कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Exit mobile version