Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंबोली घाटात मोठा दगड कोसळला; सुदैवाने जीवीतहानी नाही

सिंधूदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आंबोली घाटामध्ये धबधब्याच्या परिसरात ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास भलामोठा दगड रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा भलामोठा दगड कोसळून संरक्षक भितीकडे जाऊन स्थिरावला. या प्रकारामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झालेली नाही.

घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली, अशी माहिती पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली. दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे याचा फटका आंबोलीतील पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घटनेची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये, याकरिता योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाटात वारंवार दगड कोसळण्याचा प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्न निर्माण होतो. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान घाट परिसरात धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असतात.

Exit mobile version