Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात सायकलची चोरी; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने आलेल्या एकाची सायकल गोल्ड सीटी हॉस्पीटल समोरून अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, कृष्णकांत रविंद्र पाटील रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी हे शहरातील गोल्ड सीटी हॉस्पिटल येथे कामाच्या निमित्ताने २१ मे रोजी दुपारी २ वाजता सायकलने आले. त्यावेळी त्यांनी त्यांची सायकल गोल्ड सीटी हॉस्पिटलसमोर पार्कींगला लावली होती. सायंकाळी काम आटोपून ते घरी जाण्यासाठी सायकलजवळ आले असता त्यांनी जागेवर सायकल दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध केली परंतू मिळून आली नाही. कृष्णकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Exit mobile version