Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात सायकलची चोरी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील खान्देश मिल कॉलनी परिसरातून एकाची सायकल चोरी झाल्याची घटना उघडकीला आली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, संजिव राजमल मंत्री (वय-४३) रा. खान्देश मिल कॉलनी गणेश कॉलनी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ८ मार्च ते ३ मार्च २०२१ दरम्यान त्यांच्या घराच्या समोर पार्किंगला लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. परिसरात शोधाशोध सायकल मिळून आली नाही. दोन महिन्यानंतर काल सोमवारी २४ मे रोजी दुपारी संजिव मंत्री यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण भोसले करीत आहे.

Exit mobile version