Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिबट्याच्या हल्ल्यात तरूण शेतकरी जखमी; दापोरी शिवारातील घटना

yawal news

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील दापोरी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शेतात पाणी भरत असतांना बिबट्या मादीने अचानक हल्ला करून तरूण शेतकऱ्‍यास जखमी केले. सोबत तरूणाचा भाऊ असल्याने त्याचे प्राण वाचले असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील दापोरी शिवारात २१ जूनच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास योगेश सुनील म्हस्के व त्यांचा भाऊ चेतन म्हस्के हे आपल्या शेतातील कपाशीला पाणी लावत होते. एक भाऊ एका बांधावर तर दुसरा भाऊ एका बांधावर पाणी लावत असतांना अचानक बिबट्या मादीने बेसावध योगेश म्हस्के वर पंज्याने वार केला. याचवेळी भाऊ चेतनने हातात काठी घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु २० ते २५ फुटावर जाऊन परत ती योगेश व चेतन यांच्याकडे बघत हिंस्त्र नजरेने रोखुन बघत होती. क्षणात दोघ भावांनी आपली मोटारसायकल सुरु केली व तिचा प्रकाश बिबट्या मादीच्या चेहऱ्‍यावर मारल्याने तीने पळ काढला. दरम्यान बिबट्या मादीसोबत तिचे पिल्ले देखील असल्याचे म्हस्के बंधुंनी सांगितले. बिबट्याच्या मादीला खेडी खु. व दापोरी शिवारात नागरिकांनी गेल्या एक महिन्यापासून पहिले असुन तिने आतापर्यंत ७ ते ८ बकऱ्‍या व मेंढी मेंढपाळच्या कळपातून फस्त केले आहे.

बिबट्या मादीस नागरिकांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भिका कोळी यांच्या केळीच्या मळ्यात आपल्या पिल्लांसह वावरतांना देखील अनेक वेळेस पहिले असल्याचे सांगितले.बिबट्या मादी जास्तच हिंस्त्र झाली असून याबाबत वारंवार वनविभागाकडे तक्रारी करून देखील लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगीतले आहे. याबाबत वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सद्या जंगलात पाण्याची कमी असल्याने हे प्राणी जंगल सोडुन पाण्याच्या शोधात शेतांकडे येत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काम करतांना सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version