Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथील मुख्याधिकारीपदी भूषण वर्मा रूजू

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी भूषण वर्मा हे रूजू झाले आहेत.

येथे नगरपालिकेला मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबून पडली होती. या पार्श्‍वभूमिवर, येथे भूषण वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून ते रूजू झाले आहेत. ते सध्या लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर ते आता सावदा येथे रूजू झाले आहेत.

राज्याच्या नगरविकास खात्यातर्फे या बाबतचे शासन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार भूषण वर्मा हे सावदा येथे रूजू झाले आहेत.

Exit mobile version