Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील आशावर्कर यांचे विविध मागण्यांसाठी नगरपालिकेला निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ७२ आशावर्कर यांनी कारोनाच्या काळात जीव धोक्यात घालून घरोघरी जावून सर्वेक्षण केले. त्याच्या मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी आज नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात वाढत्या कोरोनाच्या काळात शहरातील ७२ आशा वर्कर यांनी आपला जीव धोक्यात घालून शहरातील प्रत्येक भागात जावून सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करून कोरोना टेस्टिंगचे टार्गेट देण्यात आले. दिवसाला १२ टेस्ट करावी लागत असून एका टेस्टींगसाठी ८ रूपये मानधन मिळते. दरम्यान हे मानधन परवडत नसल्याने शासनाने नियमित फिक्स पगार, आशावर्कर यांना कोरोना कीट, विमा काढून द्यावी अशी मागणी केली आहे. मिळत असलेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने शासनाकडून पिळवणूक होत असल्याची प्रतिक्रिया येथील आशावर्कर यांनी बोलून दाखवला.

 

 

 

 

Exit mobile version