Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवकांच्या कार्याचा भुसावळकरांनी आदर्श घ्यावा : संजय सावकारे

467ac5b2 417e 470a b29c 9a1e05eda0bf

 

जळगाव (प्रतिनिधी) जलसंवर्धनासाठी संस्कृती फाऊंडेशनचे कार्य मोलाचे आहे. शहरातील युवकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून श्रमदानातून दुष्काळाचा सामना करत चोरवड नाल्याला नदीचे रूप दिले याचा सर्वानी आदर्श घ्यावा,असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले आहे. प्रकल्पस्थळी भेट दिल्याप्रसंगी ते बोलत होते.

 

दुष्काळाची तीव्रता जाणून संस्कृती फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणाऱ्या “नदी पुनर्जीवन” प्रकल्पाला व्यापक स्वरूप मिळत आहे. यंदाचे पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन तसेच दुष्कावर मात करून पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे जामनेर व भुसावळ रोडवरील चोरवड जवळील नदीला पुनर्जीवित करण्यात आले आहे. या उपक्रमाला मागील महिन्यापासून सुरवात झालेली असून आता या उपक्रमाला शहरातील सुजाण नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत चोरवड नदीला श्रमदानातून पुनर्जीवन मिळाले आहे. या उपक्रमाला गेल्या दोन आठवड्यापासून सुरवात झाली असून चोरवड जवळील नदीचे कार्य हे पूर्ण झाले आहे. यामध्ये आमदार संजय सावकारे यांच्याकडून पूर्ण दिवस जेसिबी मशीन यंत्रणा देण्यात आली. तसेच श्रमदानातून सुमारे चार दगड मातीचे बंधारे या नदीवर बांधण्यात आले आणि तसेच मशीन यंत्रणेच्या सहाय्याने नदीचे सुमारे पाच ते सहा फूट खोलीकरण केले आहे.

 

शहरालगत असलेल्या या चोरवड नाल्याला नदीचे स्वरूप मिळाले आहे. श्रमदानातून नैसर्गिकरित्या जलसंधारण होऊ शकेते त्त्यासाठी उन्हाळ्यात सुट्टीचा दिवस सत्कारणी लागो ह्या अनुषंगाने संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत ह्यांचा नेतृत्वाखाली या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ह्या संपूर्ण कार्याचा नियोजन व पूर्वतयारी नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख अश्फाक तडवी व तुषार गोसावी ह्यांनी केले जलसंवर्धन ही काळाची गरज असून ही गरज ओळखून संस्थेने हा उपक्रम सुरू केला ह्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ह्या उपक्रमात शहरातील डॉक्टर, शिक्षक, जेष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन दुष्काळाशी कृतीतून मात करीत आहेत.

 

संस्कृतीच्या ह्या कार्यात श्रमदानासाठी आमदारांचा देखील सहभाग शहरातील पाणी टंचाई ओळखून संस्कृती फाउंडेशन ने उचललेल्या जल चळवळीत आमदार संजय सावकारे सुद्धा सहभागी होऊन श्रमदान करीत आहेत. ह्या श्रमदानात सुमारे सहा सात वर्षाच्या अर्सलान तडवी, खुशबू तडवी, मेहक तडवी ह्या चिमुकल्याचा देखील खारीचा वाटा मिळाला. महिन्याच्या दर शनिवार व रविवार श्रमदान करून ह्या कार्याला यश आले आहे नाल्याचे रुपांतर नदी मध्ये झाले आहे आता पावसाचे पाणी आल्यावर नदीच्या अवती भोवती वृक्ष लागवडीसाठी संस्कृती फाऊंडणेशनचे युवक सज्ज आहेत.

 

ह्या श्रमदानासाठी अजित गायकवाड, मंगेश भावे,डॉ. नीलिमा नेहते, प्रियंका पाराशर, सोहिल कच्छि, पवन कोळी, कोमल बोरणारे, माधुरी विसपुते, हर्षवर्धन बाविस्कर, इकबाल तडवी, सतीश कांबळे, मनोज तडवी सर, नितीन पाटील, संस्कार मालविया, डॉ. संजय नेहते, सोनू तडवी, विक्रांत बांगर, तेजस गांधेले इत्यादींचा सहभाग होता. तसेच श्रमदानासाठी लागणारी कुदळ, फावडे, टोपली इत्यादी साधनसामग्री ही शहरातील व्यावसायिक सुहास कोळी ह्यांनी उपलब्ध करून दिली.

 

दरम्यान, उपक्रमाला पर्यावरण प्रेमींची साथ मिळाली. त्यामुळे कार्य यशस्वी ठरले आहे. आता पुढील टप्यात पावसाळ्यात ह्या नदीच्या पात्रावर व्यापक स्वरूपात वृक्ष लागवड करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे प्रमुख अश्फाक तडवी यांनी यावेळ केले. तर लहान मोठ्यांच्या श्रमदानातून उपक्रम राबविण्यात आला ह्या उपक्रमांत संस्थेच्या सोबत अनेक दातेकरी जुडले त्यामुळे कार्य अधिक प्रगती करू शकले आम्ही आमच्या सुट्टीचा दिवस हा पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी दिला एक आनंद मिळविला आहे आता पावसाची आतुरता आहे. श्रमदानासाठी आपले अमूल्य योगदान देऊ करण्याऱ्या प्रत्येकाचा आभारी असल्याची प्रतिक्रिया संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली आहे.

 

 

Exit mobile version