Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींचा हात : मोहन निकम यांचा आरोप(व्हिडीओ)

bhusawal Niwadnuk

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातील झोपडपट्टीत सर्व जाती धर्माचे लोक राहतात, मात्र पाच हजार झोपड्या एका दिवसात बुलडोजर लावून उद्ध्वस्त केल्या. लोकप्रतिनिधींच्या हातात पुर्नवर्सनाचा कायदा असतांना हजारो वर्ष जूनी असलेली झोपडपट्टी उद्वस्त केली. ही झोपडपट्टी उद्धवस्त करण्यामागे रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आणि नगराध्यक्ष रमण भोळे यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना केला.

 

पुढे बोलतांना श्री निकम म्हणले की, महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात दलील आदीवासी यांचे जवळपास 88 खून, 477 बलात्कार झालेत, 690 विनयभंग, 379 सामूहिक हल्ले, 203 गंभीर स्वरूपाचे दुखपत, 30 ठिकाणी जाळपोट व इतर प्रकारचे गुन्हे असे एकुण 3 हजार 202 प्रकारचे गुन्हे, यात ॲस्ट्रॉसीट 2016 जून 2017 अ.जा. अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या देशात नरेंद्र मोदीचे सरकार आल्यामपासून मागावर्गीयांवर विरूध्द पध्दतीने सुरू आहे. या हिंदूत्वाचा निर्णयामुळे नागरीक हैराण झाले आहे. मोदी सरकारने मागासवर्गी, अदिवासी मुस्लिम बांधवांनी उच्च शिक्षण घेवून नये, असे षडयंत्र राष्ट्रीय सेवा संघ देशात राबवित आहे. त्यांच्या या षडयंत्रामुळे आमचे तरूण मुले बेरोजगार झाली, व्यवसाय करणाऱ्यांच्या अडचणी वाढविल्या असल्याचा देखील आरोप मोहन निकम यांनी केला आहे.

मोदी सरकारने विकासाच्या नावाने घोषणा करून गोरगरीबांसह, शेतकरी यांना कोणतीच मदत न करता मुंबईत डॉन्स बार सुरू केल्यात. अच्छे दिनच्या ऐवजी अच्छे रात्र आले आहे. अशा सरकारचा निषेध केला तर कमीच आहे. देशाचे लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडून आणणे गरजेचे आहे. भाजपाच्या निवडणुकीत काही दलीत नेते पक्षाच्या प्रचारासाठी सहभागी झाले त्यांच्याविषयी मोहन निकम यांनी नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version