Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापीच्या पुलावरून उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील जुना सातारा परिसरातल्या कोळीवाड्यातील रहिवासी तरूणाने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

याबाबत वृत्त असे की, तापी नदीच्या पात्रात एक मृतदेह पडला असल्याची माहिती आज सकाळी पोलिसांना मिळाली. यानुसार शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोहणार्‍यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. त्याची ओळख पटवली असता, हा मृतदेह जुना सातारा भागातल्या कोळी वाडा येथील रहिवासी धनंजय सुनील आंबोळकर (वय ३५) याचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तापी नदीच्या पुलावर धाव घेतली.

मृत धनंजय आंबोळकर हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली ही माहिती समोर आली नाही. त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहर पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version