यावलच्या मुख्याधिकार्‍यांना पोलीस कोठडी

भुसावळ प्रतिनिधी | कंत्राटदाराकडून २८ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना काल दुपारी रंगेहात पकडण्यात आलेले यावल येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांना आज भुसावळ येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल दुपारी एक वाजेच्या सुमारास येतील मुख्याधिकारी बबन तडवी यांना एका कंत्राटदाराकडून २८ हजा रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. काही मिनिटांमध्येच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे यावल नगरपालिकेत अक्षरश: सन्नाटा पसरला. दरम्यान, काल दुपारीच एसीबीचे पथक हे बबन तडवी यांना जळगावला घेऊन गेले होते. रात्री उशीरा त्यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम ७ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारिक कायद्याचे कलम-७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आज बबन तडवी यांना भुसावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायाधिशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता तीन दिवसांची कोठडी मिळाल्याने बबन तडवी यांचे निलंबन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content