भुसावळात रंगली महिलांची क्रिकेट स्पर्धा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सावळ येथील महिला क्रीडा मंडळातर्फे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत, शहरातील व्हिक्टरी महिला क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. तर सायलेंट वॉरियर संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकी चार षटकांचे सामने आयोजित करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रनर्स ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. निलीमा नेहेते यांच्याहस्ते सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत भुसावळ टायगर, सायलेंट वॉरियर, व्हिक्टरी आणि जॉयन्स महिला पतंजली या चार संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा अंतिम सामना व्हिक्टरी टीम विरुद्ध सायलेंट वॉरियर यांच्यात झाला. यात व्हिक्टरी टीमने दहा गडी राखून दणदणीत विजय संपादन करत विजेतेपद पटकावले.

याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, रजनी सावकारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, रनर्स गृपचे सचीव प्रवीण पाटील, जी.आर. ठाकूर, डॉ. वंदना वाघचौरे, डॉ. मधु मानवतकर, डॉ. सुवर्णा गाडेकर यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन चारू महाजन यांनी केले. या स्पर्धेत पंच म्हणून अर्षद खान, वसीम खान यांनी काम पाहिले. फकरुद्दीन शेख यांनी समालोचन केले. आरती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन प्राची राणे, चारू महाजन, ममता पाटील, सुरेखा चौधरी, वैशाली भगत, प्रभा पाटील, रश्मी ठोसर, राजश्री कात्यायनी, अनिता कवडीवाले, किरण चौधरी, सुनिता पाचपांडे, वैशाली बर्‍हाटे, मानसी चौधरी, माधुरी कव्हाळे, रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र फेगडे, ऋषीकुमार शुक्ला, वंदीता पारे, रूचिका शर्मा, सुधीर शर्मा, सारंग चौधरी, विकास कात्यायनी, विकास पाचपांडे, अनिकेत पाटील, विपीन नायडू, नरविर सिंग रावळ उपस्थित होते.

या स्पर्धेत बेस्ट बॉलर किर्ती सोनवणे, बेस्ट बॅट्समन संजना चंदाले, वूमन ऑफ द सिरीज कीर्ती सोनवणे, प्लेअर ऑफ द सिरीज किर्ती सोनवणे, फायनल प्लेअर आँफ द मॅच संजना चंदाले यांना पारितोषीके मिळाली.

Protected Content