न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन : गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी | जामीन देतांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आगाखान वाडा परिसरातील रहिवासी मकसुद अली वाजीद अली उर्फ बाबा पहेलवान याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा पहेलवान याच्याविरोधात एका प्रकरणात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. संशयिताला न्यायालयाने जामीन देताना गुन्ह्याचा तपास पुर्ण होईपर्यंत शहरात येवू नये या अटीवर जामीन दिला होता.

मात्र त्या आदेशाचे उल्लंघन करून मकसुद अली वाजीद अली उर्फ बाबा पहेलवान शहरात आला असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिस कर्मचारी सुनील साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content