Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ-देवळाली पॅसेंजर मेमू ट्रेनच्या स्वरूपात सुरू होणार !

Bhusawal भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडमुळे अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या भुसावळ ते देवळाली पॅसेंजर ट्रेनला नव्याने सुरू होण्याचा मुहूर्त अखेर लाभला आहे.

कोविडच्या प्रकोपामुळे बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होता. याचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर यातील बर्‍याचशा रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी असणार्‍या काही गाड्या अद्यापही बंद आहेत. यात प्रामुख्याने भुसावळ ते देवळाली आणि भुसावळ ते मुंबई या पॅसेंजर ट्रेन्स अद्याप देखील बंदच असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. याबाबत अनेकदा मागणी करून देखील रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आता भुसावळ ते देवळाली हे पॅसेंजरला मुहूर्त लाभला आहे. १७ सप्टेंबर २०२२ पासून ही प्रवासी गाडी दररोज नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर, ही रेल्वे गाडी आता मेमू ट्रेन या स्वरूपात धावणार असल्याचेही रेल्वेने जाहीर केले आहे. आता भुसावळ ते मुंबई पॅसेंजर केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version