Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी पिस्तुल लाऊन धमकावले : निखील राजपूतसह चौघांवर गुन्हा

भुसावळ Bhusawal-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डोक्याला गावठी पिस्तुल लाऊन खंडणीसाठी धमकावण्याच्या प्रकरणात निखील राजपूतसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील राजपूत ( Nikhil Rajput Bhusawal )याच्यावर आधी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. यात तो पुन्हा एकदा नवीन गुन्ह्यात अडकला आहे. रस्त्याने जाणार्‍यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, जय मनोज जाधव हे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आपले मित्र कुणाला राजू शिंदे, आकाश गणेश फबियानी व अमर देविदास कसोटे यांच्यासोबत वाल्मीक नगर भागात गप्पा करत उभे होते. यात निखील राजपूतसह चौघांनी यांना या भागात यावयाचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगत मारहाण सुरू केली. यात राजपूत याने कसोटे याच्या कानाला पिस्तुल लाऊन धमकावले. या मारहाणीत जय मनोज जाधव आणि अमर देविदास कसोटे हे जखमी झाले.

दरम्यान, मारहाण केल्यानंतर निखील राजपूतसह चौधांनी देविदास कसोटे याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना देखील धमकावले. या संदर्भात जय मनोज जाधव ( रा. वाल्मीक नगर, भुसावळ ) याच्या फिर्यादीवरून निखील राजपूत, अभिषेक शर्मा, पवन चौधरी आणि अक्षय न्हावकर उर्फ थापा याच्या चौघांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश भोये हे करीत आहेत.

Exit mobile version