Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीनशे रूपयांचा मोह भोवला : तलाठी एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीनशे रूपयांच्या मोहापायी तालुक्यातील साकरी येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, साकरी येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी तक्रारदाराला उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या अनुषंगाने आज गायकवाड यांनी खडका येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराला बोलावून तीनशे रूपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एसीबीच्या पथकाने त्यांना अटक करून जळगाव येथे नेल्याचे वृत्त होते. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version