अनिल चौधरींच्या हद्दपारीबाबत लवकर निर्णय घ्या : हायकोर्टाचे निर्देश

भुसावळ प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावाबाबत त्यांनी दाखल केलेली हायकोर्टातील याचिका ही परत घेतली आहे. तर कोर्टाने चौधरी यांनी केलेली विनंती मान्य करत त्यांच्या हद्दपारीबाबत लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भुसावळात सध्या हद्दपारीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. आधी खरात व नंतर सूर्यवंशी यांच्या टोळ्या हद्दपार करण्यात आल्या असून कालच वराडसीम येथील एकाला हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील सुमारे १०० जणांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू असून यातील पहिल्या टप्प्यात ५५ जण रडारवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, प्रशासनाने माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांना सुद्धा हद्दपारीची नोटीस प्रशासनाने दिली होती. त्याविरुद्ध अनिल चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या खुलासासंदर्भात प्रशासनाने न्यायालयात अहवाल दाखल केला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी सदरची याचिका परत घेतली आणि प्रशासनाने यावर लवकर सुनवाई घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर हद्दपारच्या कारवाईवरील सुनवाई तातडीने पूर्ण करावी. तसेच त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असे कोर्टाला देखील अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या कारवाईचे कामकाज प्रशासनाला लवकर चालवावे लागणार असून त्यावर लवकर निर्णय द्यावा, लागणार आहे. यात प्रशासनाला नियमानुसार पोलीस खाते आणि अनिल चौधरी या दोन्ही बाजूंची सुनावणी घेत निर्णय द्यावा लागणार आहे. यावर काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर, हद्दपारीच्या प्रक्रियेला खूप वेळ लागत असतो. मात्र आता उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे ही प्रक्रिया स्थानिक प्रशासनाला जलद गतीने करावी लागणार आहे.

Protected Content