Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या एसबीआयमध्ये कोरोनाचे संशयित; खबरदारीचा उपाय म्हणून व्यवहार बंद

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले असल्याने खबरदारचा उपाय म्हणून आज व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

भुसावळ येथील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत आज सात कर्मचारी सशंयित कोरोना बाधित आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खबरदारी घेण्यासाठी आज सकाळ पासुन बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बँकेत येणार्‍या खातेदारांना व्यवहाराविना परतावे लागले. कोरोना बाधित संशयित कर्मचार्‍यांना तपासणी साठी पाठविण्यात आले असुन त्यांचा अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे . बँकेचे व्यवहार कधी सुरू होतील हे समजु शकले नाही. याबाबतची सविस्तर माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला आहे

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधिताची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी देखील नागरिक शहरात गर्दी करीत असून विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

Exit mobile version