Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : मनोज बियाणी यांची ४० लाखांची बॅग चोरीला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील उद्योगपती तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज बियाणी यांच्या मालकीची ४० लाख रूपयांनी भरलेली बॅग प्रवासातून चोरण्यातआल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, नगरसेवक मनोज बियाणी यांचे सहकारी २८ मार्च २०२२ रोजी भुसावळ येथून बँगेत चाळीस लाख रूपये घेऊन एका ट्रॅव्हल्समधून मुंबई येथे निघाले होते. दरम्यान, संबंधीत व्यक्तीला झोप लागल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ही बॅग लांबविली. या फिर्यादीनुसार मनोज बियाणी यांचे निकटवर्तीय संजय पुरूषोत्तम तिवारी (रा. मधु डेअरी समोर, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) हे संगीतम ट्रॅव्हलच्या एमएच०३ सीपी – ३४७७ क्रमांकाच्या लक्झरी गाडीतून पाचशेच्या नोटांनी भरलेली बँग घेऊन निघाले होते. त्यांनी ही बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. मात्र रात्री त्यांना झोप लागल्याने कुणी तरी अज्ञात चोरट्याने ही बॅग लंपास केली आहे.

दरम्यान, या संदर्भात मनोज बियाणी यांनी काल भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार गुरनं २६२/२०२२ भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मंगेश गोटला हे करीत आहेत. इतकी मोठी रक्कम चोरी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

Exit mobile version