खून प्रकरणात तिसर्‍या आरोपीचा शोध सुरू

भुसावळ प्रतिनिधी | येथील तरूणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतली असून तिसर्‍याचा शोध करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोर सचिन भगत याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुन्ना चौधरी याला अटक केली असून त्याची २१ जुलैपर्यत पोलिस कोठडीत रवानगी झाली. दुसरा संशयित राहूल कल्ले याला पोलिसांनी काल ताब्यात घेतले. तर तिसर्‍या संशयिताचाही शोध घेतला जात आहे.

पोलीस पथकाला तिसर्‍या आरोपीची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कोठडीस असणारा मुख्य आरोपी मुन्ना चौधरी याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content