Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एस.एस. केडिया यांनी स्वीकारली डीआरएमपदाची सूत्रे !

भुसावळ प्रतिनिधी | येथील विभागीय रेल्वे कार्यालयातील व्यवस्थापकपदाची अर्थात डीआरएमपदाची सूत्रे एस.एस. केडिया यांनी विवेककुमार गुप्ता यांच्याकडून स्वीकारली आहेत.

केंद्रीय रेल्वे बोर्डाने काल देशातील नुकत्याच ३३ डीआरएम अथवा समकक्ष अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मध्य रेल्वेतील भुसावळ मंडळ विभागाच्या डीआरएम पदी एस.एस. केडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, विद्यमान डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची येथून बदली झाली आहे. केडिया हे इंडियन रेल्वे सर्व्हीस फॉर इंजिनिअर्सच्या १९९०च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी देशभरात विविध डिव्हीजन्समध्ये विविध पदांवर काम केले आहेत. ते सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयात चीफ ब्रिज इंजिनिअर या पदावर कार्यरत होते.

दरम्यान, केडिया यांनी आपल्या पदाची सूत्रे मावळते डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याकडून स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागांची माहिती जाणून घेतली.

Exit mobile version