Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या डीआरएमपदी एस.एस. केडिया; लवकरच स्वीकारणार कार्यभार

भुसावळ प्रतिनिधी | येथील विभागीय रेल्वे कार्यालयाच्या व्यवस्थापकपदी (डीआरएम) एस.एस. केडिया यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

केंद्रीय रेल्वे बोर्डाने काल देशातील ३३ डीआरएम अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मध्य रेल्वेतील भुसावळ मंडळ विभागाच्या डीआरएम पदी एस.एस. केडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, विद्यमान डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची येथून बदली झाली आहे. तथापि, काल जाहीर झालेल्या ३३ अधिकार्‍यांमध्ये त्यांचे नाव नाही. येत्या काही दिवसांमध्ये त्यांची नियुक्ती नेमकी कुठे झाली हे स्पष्ट होणार आहे. तर त्यांच्या जागी श्री. केडिया हे लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत.

एस.एस. केडिया हे इंडियन रेल्वे सर्व्हीस फॉर इंजिनिअर्सच्या १९९०च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी देशभरात विविध डिव्हीजन्समध्ये विविध पदांवर काम केले आहेत. ते सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयात चीफ ब्रिज इंजिनिअर या पदावर कार्यरत होते. आता ते लवकरच भुसावळ मंडळाची धुरा स्वीकारणार आहेत.

Exit mobile version