Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील स्टार ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील स्टार ग्रुपतर्फे भुसावळ रक्तपेढीच्या सहकार्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन येथील तार ऑफिसजवळ करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आ.संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

या शिबिरात मार्गदर्शन करताना आ.संजय सावकारे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करायला पाहिजे. आपल्या रक्तदानामुळे कुणाला जीवनदान मिळू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.स्टार ग्रुपच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी रक्तदात्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, डॉ.तुषार पाटील, डॉ.इमरान खान, अनिल जैन, राजेश काबरा, वाहतुकचे पोउपनि.के.टी. सुरळकर, प्रा.सुनील नेवे, नारायण रणधीर, भरत गायकवाड, आर.आर.निकम, दिनेश नायर, शेखर गौड, रोहन परदेशी, पिन्‍टू राजपूत, जाकिर कच्छी, श्‍यामू परदेशी, मुकेश सिंह, मुनसफ अली, जे.के.टेकवाणी, कुंदन कश्‍यप, अनिल डोरा, धिरज चौरसिया, प्रतिक गौड, दिनेश परदेशी, कमलेश खताळ, निखिल देहाडे, गणेश गवळे, प्रभाकर पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, धीरज वर्‍हाळे, तुषार पाटील, कुणाल देहाडे, निलेश मोरे, मनोज साळुंके, बंडूभाऊ, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version