Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र नाटकर

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य राजेंद्र नाटकर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भुसावळच्या उपनगराध्यक्षा सौ. सोनी संतोष बारसे यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. यात उपनगराध्यक्षपदासाठी राजेंद्र नाटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ज्येष्ठ सदस्य मनोज बियाणी, युवराज लोणारी, सुनील नेवे, राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ आदींसह अन्य नगरसेवक आणि प्रभागातील सदस्यांनी राजेंद्र नाटकर यांचे स्वागत केले. नाटकर हे १९९१ पासून अव्याहतपणे नगरपालिकेत निवडून येत आहेत. आता त्यांना उपनगराध्यक्षपदी १४ दिवस इतका कालखंड मिळणार आहे.

Exit mobile version