Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ रेल्वे स्थानकावर गोंधळ; रेल्वे बोगीत घाण असल्याची प्रवाशांची तक्रार (व्हिडीओ)

Bhusawal railway station

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे गाडीतील शौचालयात प्रचंड घाण असल्याने रेल्वे प्रवाश्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी येताच चांगला गोंधळ घालून रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार केली आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन वर नांदेड-सचखंड एक्सप्रेस गाडीतील प्रवाश्यांनी रेल्वे गाडीतील शौचालयात मोठ्या प्रमाणावर घाण साचली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार भुसावळ रेल्वे प्रबंधकासह प्रशासनाला केली आहे. यावेळी रेल्वेतील प्रवाश्यांनी तब्बल अडीच तास सचखंड एक्सप्रेस रोखून धरली होती. भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशी आणि रेल्वे प्रशासन यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. यावेळी प्रवश्यांचा संताप अनावर झाला होता. भुसावळ येथील दोन रेल्वे कर्मचारी नांदेड येथे रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version