Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात पोलिसांची झाडाझडती

भुसावळ प्रतिनिधी | पोलीस प्रशासनातर्फे शहरात कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यात एका वॉंटेड आरोपीसह दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यत पोलिसांनी शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. नाकाबंदी दरम्यान ११ वाहनांची तपासणी करून दंड आकारण्यात आला. एक वाहन पडताळणीसाठी ताब्यात घेतले. हद्दपार असलेल्या ११ जणांच्या घरी तपासणी केली. मात्र, कुणीही आढळले नाही. तसेच ३२ हस्ट्रीसिटरपैकी २३ जण मिळून आले. त्यांची नोंद पोलिसांनी घेतली.

शहर, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवली गेली. भुसावळ शहरात वैतागवाडी, खडका रोड, रजा टॉवर चौक, महात्मा फुले नगर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जाम मोहल्ला या परिसरात पोलिसांनी अनेक ठिकाणी झडती घेतली. ६ अटक वॉरंट, २ जामीनपात्र वॉरंट, ५३ समन्स बजावणी, वॉटेंड २२ आरोपींची तपासणी झाली. त्यापैकी एक आरोपी सापडला. तर रात्री संशयितपणे फिरणार्‍या नितीन संजय बोयत (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) आणि अक्रम शेख फकीर मोहंमद (रा.बागवान गल्ली, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे कोंबींग ऑपरेशन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, तालुका, बाजारपेठ आणि नशिराबाद पोलीस स्थानकातील सहकार्‍यांच्या मदतीने राबविण्यात आले.

Exit mobile version