Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोळीबार प्रकरणातील एक आरोपी गजाआड

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक संशयित आरोपी तरूणाला पोलिसांना गजाआड केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ शहराजवळच्या साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी रात्री दोन तरूणांवर गोळीबार करण्यात आल्याने परिसर हादरला होता. यात दोन्ही तरूण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर या प्रकरणात तीन हल्लेखोर निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, या प्रकरणातील एक संशयित असणार्‍या करण संतोष सपकाळे ( रा. खडका, ता. भुसावळ ) याच्या पोलिस पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तर अन्य दोन संशयित संतोष शंकर सपकाळे आणि जीवन रतन सपकाळे यांचा कसून शोध सुरू आहे. करण सपकाळे याला आज भुसावळ येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version