अपात्रता प्रकरणीआता २४ जूनला होणार सुनावणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांना अपात्र करण्यात यावे या अर्जावरील सुनावणी २४ जून रोजी होणार आहे.

येथील नगरपालिकेतील तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अन्य १० नगरसेवकांनी पंचवार्षिक मुदत संपण्याआधीच भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यामुळे त्यांना अपात्र म्हणून घोषीत करून सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी करावी या मागणीसाठी भाजपच्या पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला असून या प्रकरणी रमण भोळे आणि इतरांचा हरकत अर्ज फेटाळून लावला आहे. यानंतर या प्रकरणी दिनांक १७ रोजी सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीत आता अपात्रतेबाबत शुक्रवार दिनांक २४ जून रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. आगामी निवडणुकीच्या ऐन तोंडावर अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी होत असून यात नेमका काय निकाल लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content