Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात भाजपातर्फे आमदार सावकारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल (व्हिडीओ)

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसापासून सतत एकनाथ खडसे यांच्यासोबत असलेले संजय सावकारे यांनी आज भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी भाजपा, शिवसेना, रिपाइं युतीकडून आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी दाखल केला आहे.

सलग दोन टर्म पासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज सादर केला. सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुक्ताईनगरात जावून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आशीर्वादही घेतले.

भव्य प्रचार रॅलीने वेधले लक्ष
हाती भगवे झेंडे, आमदार संजय सावकारे यांचे कट आऊटस् घेवून घोषणाबाजी देणारे कार्यकर्ते त्यासोबत पारंपरीक वाद्यांचा गजर तर दुसरीकडे संत तुकाराम-ज्ञानदेवांचा अभंग गात असलेल्या वारकर्‍यांनी शिस्तीत रॅली काढत शहरवासीयांचे लक्ष वेधले. जामनेर रोडवरील दर्डा भवन या भाजपाच्या प्रचार कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली.

Exit mobile version