Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या गोळीबारातील आरोपीस पोलीस कोठडी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे हॉस्पीटलजवळ झालेल्या गोळीबारातील आजवर फरार असलेला संशयित आरोपी गोलू खरात याला अखेर पोलिसांनी अटक केली असून त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची घटना, ९ जुलै २०२० रोजी रेल्वे रुग्णालयाजवळ घडली होती. या घटनेत संशयित आतीष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात, चिन्ना, सूरज, गोविंदा, कपिल कासे (सर्व रा.भुसावळ) यांना पोलिसांनी यापुर्वी अटक केली होती. तर गोलू खरात (वय २०, रा.समतानगर, भुसावळ) हा मात्र अद्याप पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान, गोलू खरात हा शहरात आल्याची माहिती मिळाल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यातील विकास सातदिवे, परदेशी परदेशी, चेतन ढाकणे, ईश्‍वर भालेराव यांनी संशयित खरातला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायाधिशांनी दोन दिवसांती पोलीस कोठडी सुनावली.

Exit mobile version