Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ ते पाचोरा दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी होणार खुला !

Bhusawal Newsभुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ ते पाचोरा दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वेमार्गाची सुरक्षा चाचणी यशस्वी झाल्याने हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सध्या रेल्वे गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यमान दोन मार्ग हे कमी पडत आहेत. यामुळे भुसावळ ते मनमाडच्या दरम्यान तिसर्‍या रेल्वे ट्रॅकचे काम वेगाने सुरू आहे. यातील भुसावळ ते पाचोरा या दोन स्थानकांमधील रेल्वे ट्रॅक पूर्ण झालेला आहे. रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोजकुमार अरोरा यांनी दिनांक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी या मार्गाची अंतीम सुरक्षा पाहणी केली. यानंतर शुक्रवारी या मार्गावरून रेल्वेगाडीचे चाचणी घेण्यात आली.

सुरक्षा पाहणी आणि रेल्वेगाडीच्या चाचणीनंतर सुरक्षा आयुक्तांनी काही किरकोळ सुचना केल्या असून याची पूर्तता झाल्यानंतर या मार्गावरून पहिल्यांदा मालगाड्या आणि नंतर प्रवासी गाड्या धावणार आहेत. अनेकदा प्रवासी गाड्या आणि विशेष करून एक्सप्रेसमुळे मालगाड्यांना रेल्वे स्थानकावर सायडींगला टाकले जाते. आता तिसरा रेल्वे मार्ग खुला झाल्यामुळे असे होणार नाही. किमान भुसावळ ते पाचोरा दरम्यानची वाहतूक यामुळे प्रचंड गतीमान होणार असल्याची बाब स्पष्ट आहे.

Exit mobile version