Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बियाणी पब्लीक स्कूलच्या प्राचार्यपदी रूद्रसेन गंठीया

भुसावळ प्रतिनिधी । येथील ख्यातनाम बियाणी पब्लीक स्कूलच्या प्राचार्यपदी रूद्रसेन गंठिया यांची नियुक्ती करण्यात आली असून बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी त्यांचे स्वागत केले.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथिल रामेश्‍वर नगर, प्रोफेसर कॉलनीतील बियाणी पब्लीक स्कुलच्या प्रिंसीपल पदी रुद्रसेन गंठिया यांची नुकतीच निवड बियाणी एज्यूकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी केली. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. संगीता बियाणी, बियाणी मिलीटरी स्कुलचे प्रिसिपल डी एम पाटील,बियाणी गृपचे मॅनेजर गोपाळ ठाकूर, व्यावसायिक राजू पारीख, प्रवीण भराडीया आदी मान्यवर उपस्थित होते.

रूद्रसेन गंठिया यांना पंधरा वर्षाचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव असून येणार्‍या आगामी काळात ते शिक्षण क्षेत्रातून चांगले विदयार्थी घडवतील असा आशावाद डॉ. संगीता बियाणी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बियाणी पब्लीक स्कूलने आजवर मिळवलेला लौकीक हा भविष्यातही कायम राहणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

Exit mobile version