Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेवर अत्याचार करून खुनाचा प्रयत्न करणारा नराधम अटकेत ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । महिलेवर अत्याचार करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला भुसावळ पोलिसांच्या पथकांनी केलेल्या संयुक्त तपासात अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

याबाबत वृत्त असे की, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मध्यप्रदेशातील एक महिला फिर्यादी ह्या पांडुरंग टॉकीजजवळील मुंजोबा मंदीराजवळ उभ्या असतांना एका लाल रंगाचे मोटर सायकलवर एक अज्ञात ईसम त्यांचे जवळ आला व तुम्हाला जेथे जायचे असेल तेथे सोडुन देतो असे सांगीतले. पिडितने त्याचे बोलण्यावर विश्‍वास ठेऊन त्याचे मागे मोटर सायकलवर बसल्या.

यानंतर त्याने या महिलेस साकेगावच्या दिशेने असलेल्या एका शेतात निर्जनस्थळी नेण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेस शंका आल्यामुळे तिने गाडीवरुन उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नराधमाने तोंडावर चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर आरोपीने तिच्यावर शारिरिक अत्याचार केला. यानंतर पिडीतेला मारण्यासाठी त्याने दगड उचलल्यानंतर ती महिला पळून पेट्रोल पंपावर आल्याने त्या नराधमाने पळ काढला.

संबंधीत पिडीत महिलेने पेट्रोल पंपावरील लोकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी पोलिसांची पथके स्थापन करून चौकशीला प्रारंभ केला. पिडीतेने दिलेली माहिती, लाल रंगाची मोटारसायकल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यांच्या मदतीने पोलीसांनी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (वय २८ वर्षे, रा.शिवकॉलनी, रेलदुनीया, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधीत तरूणावर आधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी दिली.

या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे व सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, सपोनि मंगेश गोंटला, सपोनि संदीप दुनगहु, सपोनि रुपाली चव्हाण यांच्यासह अंमलदार पाहेकॉ जितु पाटील, अनिल पाटील, अयाज सैय्यद, पोना रविंद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, दिपक पाटील, विकास सातदीवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, दिनेश कापडणे, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जिवन कापडे, सचिन चौधरी, प्रशांत सोनार यांनी परिश्रम घेतले.

खालील व्हिडीओत पहा या गुन्ह्याबाबत अर्चीत चांडक व सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेली माहिती.

Exit mobile version