Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ न्यायालयात होणार मोटार अपघात दाव्यांचे कामकाज

भुसावळ प्रतिनिधी । येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आता मोटार अपघाताचे दावे चालवले जाणार असून याबाबतचे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे पक्षकारांना जळगावला जाण्याचा त्रास वाचणार आहे.

आजवर शहरासह विभागातील मोटार अपघात दावे जळगाव न्यायालयात चालवले जात होते. भुसावळ शहरात २०१४ मध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झाले. त्यानंतर मोटार अपघात दावा न्यायाधिकारणही सुरु व्हावे, अशी मागणी होती. याबाबत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून याची मागणी केली होती. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. यासंर्भात १२ नोव्हेंबर रोजी रात्रपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार आता भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अपघात दावा न्यायाधिकरण सुरु होऊन कामकाज चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपघातात नुकसान भरपाईसाठी ज्यामध्ये मोटार वाहनाच्या वापरामुळे व्यक्तींना मृत्यू किंवा शारिरिक इजा पोहोचवणे किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी करणे आदीं प्रकरणातील दाव्यांवर निर्णयासाठी आता भुसावळातूनच कामकाज चालणार आहे. यामुळे पक्षकारांना दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version