Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील टोळ्यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावांवर कार्यवाही

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील चार गुन्हेगारांच्या टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून याबाबत चौकशीसह कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील चार टोळ्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. त्यातील एका प्रस्तावाची चौकशी होऊन तो प्रस्ताव संबंधितांचे जाबजबाब घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना करण्यात आला आहे. तर उर्वरित तीन प्रस्तावातील सदस्यांना नोटीसा देऊन त्यांचीही चौकशी केली जाईल, तसेच संबंधितांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

दरम्यान, आधीच्या प्रस्तावांवर चौकशी होण्याआधी अजून दोन नवीन हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यात दोन नवीन टोळ्यांचा समावेश असून ते लवकरच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना केले जाणार आहेत, अशी माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमिवर पोलीस प्रशासनाने हद्दपारीच्या हालचाली सुरू केल्या असून यामुळे टोळीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. प्रस्तावानुसार कार्यवाही पूर्ण झाल्यास शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version