Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात भाजपचे गटनेते मुन्ना तेली यांची राजीनामा

भुसावळ प्रतिनिधी । नगरपालिकेतील भाजपचे गटनेते हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

गत म्हणजे २०१६च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत मुन्ना तेली हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर मात्र त्यांना आश्‍चर्यकारकरित्या भारतीय जनता पक्षाने आपले गटनेते म्हणून निवडले होते. नगरपालिकेच्या या पंचवार्षिकमध्ये मुन्ना तेली यांची महत्वाची भूमिका होती.

मध्यंतरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या आप्तांनी राष्ट्रवादीची वाट धरली. यात अगदी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यापासून ते अनेक नगरसेवकांच्या पत्नी वा पतींचा समावेश आहे. अर्थात, ते पुढील निवडणूक खडसे यांच्याच मार्गदर्शनाखाली लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, मुन्ना तेली यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नव्हती. यातच त्यांनी २१ एप्रिल रोजी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

आपण कौटुंबिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मात्र विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ते पुढील निवडणूक नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली लढविणार आहेत.

Exit mobile version