Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाचखोर उपनिरिक्षक हवालदाराला जामीन

भुसावळ प्रतिनिधी । लाचप्रकरणी अटकेत असलेले वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराची शनिवारी जामिनावर सुटका झाली आहे.

साकेगाव येथील तक्रारदाराच्या डंपरमधून वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक होते. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (५६, रा.भिरूड कॉलनी, भुसावळ) आणि हवालदार गणेश महादेव शेळके (३१, पोलिस वसाहत, वरणगाव) यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. यानंतर एसीबीने सापळा रचून त्यांना गुरुवारी अटक केली. यानंतर आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी शनिवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही संशयितांनी दर मंगळवारी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी, असे आदेश न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी दिले.

सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे, तर आरोपीतर्फे अ‍ॅड.आर.के.पाटील यांनी काम पाहिले. तपास जळगाव एसीबीचे उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version