Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत तळवेलचे तीन तरूण ठार

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील फुलगाव बायपास जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तळवेल येथील तीन तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज घडली आहे. यामुळे तळवेल परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत वृत्त असे की, तळवेल येथील विवेक सुनील पाटील, देवानंद सोपान पाटील आणि तुषार राजेंद्र पाटील हे तीन तरुण सकाळी भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून ते दुपारी एम एच १९ यु ७८६३ या क्रमांकाच्या मोटारसायकलीवर घरी निघाले. यात महामार्गावर फुलगाव फाट्याजवळ कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तिघांनाही जबर मार लागला.

या अपघातात विवेक सुनील पाटील (वय १७) घटना स्थळावरच मयत झाला. तर देवानंद सोपान पाटील (वय १६ ) व तुषार राजेंद्र पाटील (वय १७) हे उपचार घेत असतांना मृत झाले. तर विवेक पाटिल याचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.क्षितीजा हेंडवे यांनी केले असुन देवेंद्र पाटिल व शाम पाटिल या दोघांचे शवविच्छेदन जळगाव सामान्य रुग्णालयात करण्यात आले आहे.

या संदर्भात अनिल प्रभाकर पाटील राहणार तळवेल यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात वाहना विरुद्ध नोंद करण्यात आली आहे तपास सपोनि संदिप बोरसे , पोहे कॉ मनोहर पाटील , मुकेश जाधव , नागेंद्र तायडे होमगार्ड महेश पाटील करीत आहेत. दरम्यान, या भयंकर अपघातामुळे तळवेल गावावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version