Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ तालुक्यात २१ ट्रान्स्फॉर्मरसाठी ९० लाखांचा निधी मंजूर

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील गावांमध्ये २१ नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या (डीपीडीसी) अंतर्गत ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे.

भुसावळ तालुक्यातील काही गावांमध्ये विजेच्या दाबाची समस्या भेडसावत आहे. शेती पंप , त्या – त्या गावांतील पाणीपुरवठ्याचे पंप व घरगुती विजेची समस्या दूर करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी तालुक्यात वीज ओव्हर लोडिंग होत असलेल्या लहान – मोठ्या गावांसाठी २१ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या (डी. पी. डी. सी.) अंतर्गत ९० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन मंजूर ट्रांसफार्मर मुळे शेती , पाणी पुरवठा व घरगुती वीज ओवर लोडिंग ची समस्या कमी होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

या गावांना मिळणार नवीन ट्रान्सफॉर्मर्स !

कुर्‍हे पानाचे येथे ३ नवीन ट्रान्सफॉर्मर ( १८ लक्ष ०७ हजार २१६ ) वराडसीम – १ (४ लक्ष ), साकरी – ४ ट्रान्सफॉर्मर(१७ लक्ष ), मांडवेदिगर २ ट्रान्सफॉर्मर(९ लक्ष ), चोरवड -२ ट्रान्सफॉर्मर (९ लक्ष ), सुनसगाव २ (६.४० लक्ष), गोंभी (३.७६ लक्ष), साकेगाव (४ लक्ष), वांजोळा (४.११लक्ष) , तळवेल १ ट्रान्सफॉर्मर (३.६० लक्ष), खिर्डी भुसावळ शिवार २ ट्रान्सफॉर्मर ( ७.०८ लक्ष ) असे एकूण २१ नवीन ट्रान्सफॉर्मर साठी सुमारे ९० लक्ष निधी मंजुर झाला आहे. तसेच, १-२ महिन्यात गरज असलेल्या गावांकरीता १ कोटी पर्यंत निधी मंजूर करणार असल्याचेही आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

Exit mobile version