Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हद्दपार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

farar aaropi atak bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । एक वर्षाकरीत हद्दपार असणारा आरोपी हा बेकायदेशीर पध्दतीत शहरात आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या बातमी वरून एक वर्षे करीत हद्दपार असलेला आरोपी अमोल काशिनाथ राणे (वय-२२ रा.श्रीराम नगर भुसावळ) हा शहरातील विठ्ठील मंदिर वार्ड विठ्ठल मंदिर चौक येथे बेकायदेशीर रित्या प्रवेश करताना मिळुन आला. यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध भाग ६ गुरन ५५१/२०१९ मुंबई पोलीस कायदा कलम-१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नेव्हील बाटली,पो. काँ.कृष्णा देशमुख,तुषार पाटील,प्रशांत परदेशी यांनी केली आहे.

Exit mobile version