Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम’तून रोजगार उपलब्ध होऊ शकतो – प्रा.अनंत भिडे

yawal newss

भुसावळ प्रतिनिधी । अभियंत्यांच्या रोजगार क्षमते विषयी प्रश्न निर्माण होत असतांना “इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम” हे रोजगार उपलब्धतेबाबत तिहेरी अस्त्र ठरू शकते, असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम विभागाचे प्रा.अनंत भिडे यांनी केले. आज ५ जुलै रोजी महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थिनी संवाद मेळावा दरम्यान विद्यार्थिनींनी मते मांडली.

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या वतीने विविध उद्योग क्षेत्रात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यावेळेस अत्यंत सुखद असा फीडबॅक प्राध्यापक वर्गाला मिळाला की इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या ह्या महिला अभियंत्या जगभरातील नामांकित उद्योगांमध्ये ठसा उमटवून राहिल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉमची पदवी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील रोजगार उपलब्ध करून देते तसेच दूरसंचार अर्थात टेलिकॉम क्षेत्र मग ते लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, सॅटेलाईट कम्युनिकेशन किंवा आंतर ग्राहीय कम्युनिकेशन रोजगार उपलब्ध आहेत. यावर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा तेव्हढयच ताकदीने संधी निर्माण करू शकतो असे मत टेक महिंद्रामध्ये काम करणाऱ्या स्वेता सिंह हिने सांगितले.

कॉग्नीझन्ट या नामांकित कंपनीमध्ये असलेल्या मयुरी कुलकर्णी हिने इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनेरिंगच्या अभ्यासक्रमाची लवचिकता प्रचंड असून मायक्रोप्रोसेसर, मायक्रोकंट्रोलर, कॉम्पुटर कम्युनिकेशन, सॅटेलाईट कम्युनिकेशन, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, डिजिटल इमेज व डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हे विषय सशक्त अभियंता घडवत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात.

नाविन्यपूर्ण बदल करण्याच्या प्रणालीमुळे कौशल्यवृध्दी वाढली – श्रुती सैतवाल
मेडिकल इक्यूपमेंट, सर्जरी इक्यूपमेंट्स मध्येही इलेक्ट्रॉनिक्स उपकरण व सेन्सर्स यांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला प्रचंड संधी निर्माण करून देतो असे मत बार्कलेज टेक्नॉलॉजी मध्ये काम करणाऱ्या सायली जावळे हिने मांडले. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स सोबत इतर अभियांत्रिकी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करण्याच्या प्रणाली शिकल्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक उद्योग या क्षेत्राशी संबंधित कौशल्यवृध्दी वाढली, असे मत टाटा कंसल्टन्सी मधील महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रुती सैतवाल हिने सांगितले.

Exit mobile version