Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे : एकाच कुटुंबातील चौघांना आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळ प्रतिनिधी | आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात वृत्त असे की, शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिक्षाचालक विलास भोळेंसह परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध आढळले. यानंतर या चौघांना डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले. यातील विलास भोळे वगळता कुटुंबातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, घरात पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून यात आर्थिक विवंचनेतून आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

Exit mobile version