Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाकू हल्ला : माजी नगरसेवक संतोष बारसेंसह चौघांवर गुन्हा दाखल

FIR

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तरूणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील टेक्निकल हायस्कूल समोर रविवार दिनांक ३१ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडित याच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. अजयसिंगचा मित्र पासी याचे हर्षलकडे फर्निचरचे ३० हजार रूपये घेणे होते. अजयची हर्षलसोबत ओळख असल्याने पासीने त्यास मध्यस्थी करायला सांगितल्याने झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आता शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात दाखल फिर्यादीनुसार हर्षलने त्याच्या हातातील चाकूने अजयसिंगवर वार केले. मुकेश भालेरावने पिस्तूल उलट्या बाजूने डोक्यात मारले. भरतने दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तर संतोष बारसे यांनी अगोदरच जीवे मारण्याची धमकी दिली होती असे अजयसिंग पंडीत फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार या सर्वांच्या विरूध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय संदीप दुणगहू हे करत आहेत.

Exit mobile version