Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातून दुचाकी चोरट्यास अटक

bhusawal duchaki chori news

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात दुचाकी विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास बाजार पेठ पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून दुचाकी हस्तगत केली आहे.

28 ऑक्टोबर रोजी फिर्यादी वसंत रामा भोई रा. पाडळसा ता.यावल यांची मोटारसायकल एमएच 19 सीजी 9534 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासाधिकारी यांनी भुसावळातील मुस्लीम कॉलनी, खडका रोड येथे एक अनोळखी व्यक्ती दुचाकी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी मुंकद डिंगबर सुरवाडे रा.वाघनगर जळगाव जि. जळगाव यांची विचारपूस केली. भुसावळ शहरात मुस्लिम कॉलनी, खडका रोड भागात वाहन विक्रीसाठी आणली होती. सोबत असलेल्या दुचाकी ही चोरीची असल्याने मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.

पो.ना. नेव्हील बाटली, रविंद्र बिऱ्हाडे, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, होमगार्ड शक्तीसिंग चंदेल यांनी कारवाई केली. या गुन्हाचा तपास पो.ना.दिपक जाधव करीत आहेत.

Exit mobile version