Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात हद्दपार आरोपीला अटक

भुसावळ प्रतिनिधी | दोन वर्षांसाठी हद्दपार केले असून देखील भुसावळातच वास्तव्य करणार्‍या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे याला जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. मात्र हद्दपार असतांनाही तो समता नगरात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. यानंतर त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुुणगहू, समाधान पाटील व अन्य कर्मचार्‍यांना याबाबतची माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

या अनुषंगाने शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version