Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातून दुचाकी संशयित आरोपी ताब्यात; दुचाकी हस्तगत

abhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परीसरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातीत संशयित आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत केली आहे.

याबाबत माहिती अशी की, अजय गोपीचंद कामनानी रा. सिंधी कॉलनी, जामनेर रोड यांच्या राहत्या घरासमोरून 18 ऑक्टोबर 2019 रोजी दुकाची क्रमांक एमएच 19 एडब्ल्यू 3787 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. भाग 5 गुरन 0519/2019 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. तरी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी भिकन ताराचंद पवार (वय 27) रा. नागद तांडा ता.कन्नड जि.औरंगाबाद यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथुन 26 नोव्हेबर 2019 रोजी संशयित आरोपीस अटक करून त्याच्‍या ताब्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अटक केली. पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहेत.

Exit mobile version