Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात आज पाच केंद्रांवर मिळणार कोविशील्ड लस

भुसावळ Bhusawal प्रतिनिधी । शहरात आज पाच लसीकरण केंद्रांवर कोविशील्ड लसीचे डोस उपलब्ध झालेले असून यात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लसींचा अपूर्ण पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. Bhusawal Corona Vaccination या पार्श्‍वभूमिवर, आज अर्थात १३ मे रोजी भुसावळ शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. शहरात पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय, वरणगाव रोड व खडका रोड केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येईल. या प्रत्येक केंद्रावर १५० डोस दिले जातील. तसेच बद्री प्लॉट केंद्र व महात्मा फुलेनगर आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल.

या पाचही केंद्रावर १५० डोस उपलब्ध आहेत. यापैकी तीन केंद्रांवर पहिला, तर दोन केंद्रांवर दुसरा डोस मिळेल. हे डोस ४५ पेक्षा अधिक वयोगटालाच मिळतील. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण होणार नाही. महत्वाचे म्हणजे आज शहरातील कोणत्याही केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Exit mobile version