Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात पोलिसांचे ‘कोंबींग ऑपरेशन’

भुसावळ प्रतिनिधी | डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यात संशयावरून फिरणार्‍यांना अटक करण्यासाठी एकाच्या घरातून तलवार जप्त करण्यात आली.

भुसावळ शहरासह परिसरातील गुन्हेगारी कृत्यांची वाढती संख्या पाहता डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री झाडाझडती घेण्यात आली. यात भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक पडघन, एपीआय गणेश धुमाळ, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, एपीआय अमोल पवार, नशिराबाद पोलिस ठाण्याचे एपीआय मोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी भाग घेतला.

या ऑपरेशनमध्ये हुडको कॉलनी, मुस्लिम कॉलनी, जाममोहल्ला, साकेगाव, दीनदयाल नगर, पांडुरंग टॉकीज परिसर आदी भागांमध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये भुसावळ येथील बसस्थानक परिसरातून चोरीच्या उद्देश्याने लपलेल्या हसनअली नियाज अली (रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) याला ताब्यात घषण्यात आले. मुस्लिम कॉलनीत शेख अब्दुल कलीम याच्या घरातून तलवार जप्त करण्यात आली. अमान शेख साजीद व रोहित करण बारेला या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. याच्या सोबत ९ अजामीनपात्र, ११ जामीनपात्र वॉरंट आणि ६७ समन्स देखील बजावण्यात आले. २७ आरोपींचा शोध घेण्यात आला. याशिवाय ११ तडीपार गुन्हेगारांच्या घराची तपासणी देखील करण्यात आली. तर या ऑपरेशनमध्ये विना क्रमांकाची २१ वाहने पकडून कारवाई झाली. याशिवाय ७ वाहने जप्त करण्यात आली.

Exit mobile version