Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ ब्रेकींग : ७५ लाखांचा ड्रग्ज जप्त; दोन जणांना अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील हॉटेल मधुबन परिसरात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७५ लाख ८० हजारांचा मेथाक्वालेन ड्रग्ज आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रेसचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी चाळीसगाव व नाशिक यांचे कनेक्शन जोडले गेलेले होते. त्यात भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल मधुबन परिसरात काहीजण ड्रग्ज मोठा साठा घेवून जात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी कुणाला भरत तिवारी रा. तापी नगर. भुसावळ आणि जोसेफ जॉन वाडाल्यारेस रा. कंटेन यार्ड, भुसावळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ लाख ८० हजारांचा ९१० ग्रॅम मेथाक्वालोन ड्रग्ज आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करीत आहे.

Exit mobile version