Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ बोईसर बसला अपघात : १५ प्रवासी जखमी

ठाणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-बोईसर बसला आज सकाळी खोल दरीत उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भुसावळहून बोईसरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या रातराणी बसला पालघर नजीक वाघोबा खिंडीत उलटून अपघात झाला. या बसचे चालक नाशिक येथे बदलण्यात आले होते. चालकाने मद्यपान केले असून भरधाव वेगाने बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. भरधाव वेगात असल्यानेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भल्या पहाटे सकाळी ६ वाजेच्या सुमारास पालघर नजीक असलेल्या वाघोबा खिंडीतील खोल दरीत बस कोसळली असा दावा या अपघातात जखमी प्रवाशांनी केला आहे. अपघातस्थळी महसूल, पोलीस आणि एसटी महामंडळ अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य करीत जखमींना  पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version